जेव्हा लोक व्यवस्था किंवा त्याचे ठेकेदार यांना घाबरतात, तेव्हा तेथे दडपशाही चालू असते ! – कर्नाटक उच्च न्यायालय

जेव्हा व्यवस्था किंवा त्याचे ठेकेदार हे लोकांना घाबरतात, याचा अर्थ तेथे स्वातंत्र्य असते; मात्र जेव्हा लोक व्यवस्था आणि त्याचे ठेकेदार यांना घाबरतात, तेव्हा मात्र तेथे दडपशाही चालू असते, असे विधान कर्नाटक उच्च न्यायालयाने केले.

तुम्ही मला साथ द्या, मी हिंदु राष्ट्र बनवेन !

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे हिंदूंना आवाहन ! ‘तुम्ही मला साथ द्या, मी हिंदु राष्ट्र बनवेन’, अशी घोषणा येथील बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी २३ जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांच्या रायपूर येथील दरबारमध्ये केली.

भारतीय बनावटीची मोबाईल ऑपरेटिंग सिस्टिम ‘भरोस’चे परीक्षण

केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वदेशी बनावटीची मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम (ओ.एस्., भ्रमणभाष प्रणाली) ‘भरोस’चे परीक्षण केले. ही प्रणाली आयआयटी मद्रासने विकसित केली आहे.

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्यावर प्रश्‍न उपस्थित करणारे हिंदू सनातन धर्माच्या विरोधात !

द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती यांचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना समर्थन !

मध्यप्रदेशात सलीम खान यांनी इस्लाम त्यागून केला हिंदु धर्मात प्रवेश !

राज्यातील मुरैना जिल्ह्यातील अंबाह क्षेत्राच्या अंतर्गत येणार्‍या खडियाहार येथे वास्तव्य करणार्‍या सलीम खान नामक एका वृद्ध व्यक्तीने हिंदु धर्मात प्रवेश केला. त्यांचे ‘बाबा सुखराम दास’ असे नामकरण करण्यात आले.

कर्नाटकातील पंचलिगेश्‍वर मंदिराच्या जत्रोत्सवात मुसलमानांकडून थाटण्यात आलेली दुकाने हटवली !

हा जत्रोत्सव चालू होण्याच्या आधी विश्‍व हिंदु परिषदेने मुसलमानांच्या दुकानांवर बहिष्कार घालण्याची मोहीम हाती घेऊन त्या अनुषंगाने जागोजागी भित्तीपत्रके लावली होती.

चीन सीमेवर भारताकडून केली जाणार १३५ किलोमीटर लांब महामार्गाची निर्मिती !

भारताने चीनला कोणत्याही स्थितीमध्ये प्रत्युत्तर देण्याची सिद्धता म्हणून लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील चुशूल ते डेमचौक या मार्गावर १३५ किलोमीटर लांब महामार्ग बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

केरळमध्ये पी.एफ्.आय.च्या २४८ कार्यकर्त्यांची संपत्ती जप्त !

केरळ उच्च न्यायालयाच्या आदेशावरून राज्य सरकारची कारवाई
बंदच्या काळात करण्यात आली होती सरकारी संपत्तीची हानी

श्री संत वेणास्वामी मठाच्या वतीने १ ते ६ फेब्रुवारी मिरज ते सज्जनगड पायी दिंडी !

मिरज येथून प्रस्थान होऊन सांगली, तुंग, आष्टा, ईश्वरपूर, कासेगाव, कराड, खोडशी, नागठाणे, सातारा, सज्जनगड असा दिंडीचा मार्ग असणार आहे.

‘गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थे’च्या पुढाकाराने पुणे जिल्ह्यातील ‘तिकोनागडा’च्या संवर्धनाकरिता विकास आराखडा सिद्ध !

छत्रपतींनी निर्माण केलेल्या गडदुर्गांचे संवर्धन करण्यासाठी ‘गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था’ शिवभक्तांच्या साहाय्याने तिकोनागडावर दुर्गसंवर्धनाचे कार्य करत आहे.