श्री संत वेणास्वामी मठाच्या वतीने १ ते ६ फेब्रुवारी मिरज ते सज्जनगड पायी दिंडी !

मिरज (जिल्हा सांगली) – ब्राह्मणपुरी येथील श्री संत वेणास्वामी मठाच्या वतीने १ ते ६ फेब्रुवारी या कालावधीत मिरज ते सज्जनगड पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मिरज येथून प्रस्थान होऊन सांगली, तुंग, आष्टा, ईश्वरपूर, कासेगाव, कराड, खोडशी, नागठाणे, सातारा, सज्जनगड असा दिंडीचा मार्ग असणार आहे.

दिंडी प्रतिकात्मक चित्र

दिंडी काळात मुक्कामाच्या ठिकाणी कीर्तन, भजन, प्रवचन आणि उपासना आदी कार्यक्रम होणार आहेत. तरी समर्थसेवक आणि भाविक भक्तांनी पायी दिंडीत सहभागी व्हावे, असे आवाहन श्री संत वेणास्वामी मठाचे मठाधिपती पू. कौस्तुभबुवा रामदासी यांनी केले आहे.