केरळमध्ये पी.एफ्.आय.च्या २४८ कार्यकर्त्यांची संपत्ती जप्त !

  • केरळ उच्च न्यायालयाच्या आदेशावरून राज्य सरकारची कारवाई

  • बंदच्या काळात करण्यात आली होती सरकारी संपत्तीची हानी

कोच्चि (केरळ) – केरळ सरकारने जिहादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (पी.एफ्.आय.च्या) २४८ कार्यकर्त्यांची संपत्ती जप्त केली आहे. याची माहिती सरकारने केरळ उच्च न्यायालयात दिली. सप्टेंबर २०२२ मध्ये पी.एफ्.आय.वर बंदी घातल्यानंतर तिच्या कार्यकर्त्यांनी राज्यात बंद पाडून सरकारी मालमत्तेची हानी केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने संबंधितांकडून हानीभरपाई वसूल करण्याचा आदेश दिला होता. त्या आदेशावरून पी.एफ्.आय.च्या कार्यकर्त्यांची संपत्ती जप्त करण्यात आली. सर्वाधिक मलप्पूरम् जिल्ह्यात १२६ कार्यकर्त्यांची संपत्ती जप्त करण्यात आली.

१. इंडियन युनियन मुस्लिम लीगने याविषयी केरळ सरकारवर आरोप करतांना म्हटले आहे की, या कारवाईत निर्दोष लोकांना अडकवण्यात आले आहे आणि जे दोषी आहेत, त्यांना सरकार वाचवत आहे.

२. सप्टेंबर २०२२ ला झालेल्या बंदच्या काळातील हिंसाचारात ८६ लाख रुपयांच्या सरकारी संपत्तीची, तर १६ लाख रुपयांच्या खासगी संपत्तीची हानी झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी ३६१ गुन्हे नोंदवून २ सहस्र ६७४ जणांना अटक केली होती.