श्री हनुमानाने प्रभावित होऊन हिंदु धर्म स्वीकारल्याची माहिती !
भोपाळ – राज्यातील मुरैना जिल्ह्यातील अंबाह क्षेत्राच्या अंतर्गत येणार्या खडियाहार येथे वास्तव्य करणार्या सलीम खान नामक एका वृद्ध व्यक्तीने हिंदु धर्मात प्रवेश केला. त्यांचे ‘बाबा सुखराम दास’ असे नामकरण करण्यात आले. ‘श्री हनुमानामुळे प्रभावित होऊन आणि माझ्या अंतरात्म्याचा आवाज ऐकून मी इस्लाम त्यागून हिंदु धर्म स्वीकारला’, असे बाबा सुखराम दास यांनी सांगितले.
सलीम से बाबा सुखराम बने मुस्लिम बुजुर्ग, हनुमान मंदिर में दीक्षा लेकर की घर वापसी: कहा- अंतरात्मा की आवाज सुन इस्लाम छोड़ा, हिंदू बना#MadhyaPradesh https://t.co/9hnvWy7Des
— ऑपइंडिया (@OpIndia_in) January 23, 2023
१. बाबा सुखराम दास मागील काही मास येथील श्री हनुमान मंदिरात भजन-कीर्तन करत असत. मागील वर्षभरात त्यांची हिंदु धर्माप्रती श्रद्धा वाढायला लागली. या कारणाने त्यांनी घर सोडले.
२. त्यानंतर ते खडियाहार येथील बांधण्यात आलेल्या श्री हनुमान मंदिरात गेले. तेथील महंतांना त्यांनी, ‘मी मुसलमान आहे आणि मला हिंदु धर्मात प्रवेश करायचा आहे’, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी महंतांना गुरु मानून मंदिरात पूजा-पाठ करण्यास प्रारंभ केला.
३. ‘भगवान आणि गुरु महाराज यांच्या कृपेमुळे मला हिंदु धर्माची दीक्षा मिळाली आहे. मी कोणत्याही दबावाखाली न येता स्वेच्छेने हिंदु धर्मात प्रवेश केला आहे. मी माझी पत्नी, माझी ४ मुले आणि ६ नाती यांचा त्याग केला आहे’, असे ते म्हणाले.
४. श्री हनुमान मंदिरातील भव्य कार्यक्रमात बाबा सुखराम दास यांनी हिंदु धर्म स्वीकारला. याची माहिती मिळताच त्यांचे कुटुंबीयही मंदिरात पोचले. त्या वेळी त्यांच्या पत्नीने, ‘माझ्या पतीने हिंदु धर्म स्वीकारल्यामुळे मला कसलीही तक्रार नाही. त्यांना चांगले वाटल्यामुळेच त्यांनी हिंदु धर्म स्वीकारला’, असे सांगितले.