चीन सीमेवर भारताकडून केली जाणार १३५ किलोमीटर लांब महामार्गाची निर्मिती !

नवी देहली – भारताने चीनला कोणत्याही स्थितीमध्ये प्रत्युत्तर देण्याची सिद्धता म्हणून लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील चुशूल ते डेमचौक या मार्गावर १३५ किलोमीटर लांब महामार्ग बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

सैनिकीदृष्ट्या या महामार्गाचे महत्त्व अधिक असणार आहे. याच्या निर्मितीचे काम बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनला देण्यात आले आहे. २ वर्षांत हा मार्ग बांधून पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी ४०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.