हिंदु राष्‍ट्र सेनेने श्री सिद्धरामेश्‍वर गड्डा यात्रेतील ‘क्रॉस’ हे ख्रिस्‍ती चिन्‍ह काढण्‍यास भाग पाडले !

येथे श्री सिद्धरामेश्‍वर गड्डा यात्रेची पूर्वसिद्धता चालू असतांना ‘मलेशिया टॉवर’ची प्रतिकृती उभारण्‍यात येत होती. या प्रतिकृतीवर ‘क्रॉस’ हे ख्रिस्‍ती चिन्‍ह लावण्‍यात आले होते.

नंदुरबार येथे ‘पठाण’ चित्रपटावर बंदी घालण्‍याच्‍या मागणीसाठी जिल्‍हाधिकार्‍यांना निवेदन !

अभिनेता शाहरूख खान यांची प्रमुख भूमिका असलेल्‍या आगामी ‘पठाण’ चित्रपटात हिंदु धर्मियांच्‍या भावना दुखावण्‍याचा प्रयत्न करण्‍यात आला आहे. असा चित्रपट प्रदर्शित करू नये. जर चित्रपट प्रदर्शित झाला, तर कायदा आणि सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो.

औरंगजेब, अफझलखान यांचे उदात्तीकरण करणार्‍यांनी महाराष्‍ट्रात राहू नये ! – आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले

कुणीही उठतो आणि मनाला वाटेल ते बोलतो. अशा लोकांनी महाराष्‍ट्रात राहू नये, असे प्रतिपादन सातारा येथील भाजपचे आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रसिद्धीमाध्‍यमांशी संवाद साधतांना केले.

विज्ञान एकातरी क्षेत्रात धर्मशास्त्राच्या पुढे आहे का ?

विज्ञान वनस्पतींची केवळ भौतिक माहिती सांगते. याउलट कोणत्या देवतेला कोणते पान, फूल, वाहावे इत्यादी माहितीही अध्यात्मशास्त्र सांगते.ʼ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सर्व प्रशासकीय यंत्रणांनी उत्तम समन्‍वय राखत ‘जी २०’ परिषदेचे आयोजन यशस्‍वी करावे ! – चंद्रकांत पाटील, पालकमंत्री

‘परिषदेला ३७ देशांतील १५० हून अधिक प्रतिनिधी येणार असल्‍याने सुरक्षाविषयक, तसेच शिष्‍टाचारासंबंधी सर्व काळजी घ्‍यावी. पुणे आणि महाराष्‍ट्राची औद्योगिक क्षमता, गुंतवणुकीची क्षमता संपूर्ण कौशल्‍याने प्रदर्शित करावी’, असेही पाटील यांनी सांगितले.

नेमेचि होते आरडाओरड !

भ्रष्‍टाचाराच्‍या प्रकरणांचे खटले जलद गती न्‍यायालयात चालवून भ्रष्‍टाचार्‍यांना कठोर शासन झाले पाहिजे. तरच भ्रष्‍टाचार करणार्‍यांना चाप बसेल आणि मग त्‍यांच्‍या समर्थनार्थ कुणाला आरडाओरड करण्‍याची सोयच उरणार नाही ! भ्रष्‍टाचार्‍यांसह त्‍यांचे समर्थन करणार्‍यांवरही सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !