औरंगजेब, अफझलखान यांचे उदात्तीकरण करणार्‍यांनी महाराष्‍ट्रात राहू नये ! – आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा, ११ जानेवारी (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास मोडून तोडून सांगण्‍याची ‘फॅशन’ होत आहे. राजकीय हेतू ठेवून औरंगजेब, अफझलखान यांचे उदात्तीकरण करण्‍याची चढाओढ चालू आहे. कुणीही उठतो आणि मनाला वाटेल ते बोलतो. अशा लोकांनी महाराष्‍ट्रात राहू नये, असे प्रतिपादन सातारा येथील भाजपचे आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रसिद्धीमाध्‍यमांशी संवाद साधतांना केले.

ते म्‍हणाले की, इतिहासातील गोष्‍टींवर टीकाटिप्‍पणी करून प्रसिद्धी मिळवणे दुर्दैवी आहे. एका बाजूला ‘छत्रपती आमचे दैवत आहे’, असे म्‍हणायचे आणि दुसरीकडे त्‍यांचे महत्त्व अल्‍प करायचे. प्रतापगड येथील अफझलखानाच्‍या वधाचा विषय इतिहासाची उंची अल्‍प करायला लागला, तर ते चुकीचे आहे.