नंदुरबार येथे ‘पठाण’ चित्रपटावर बंदी घालण्‍याच्‍या मागणीसाठी जिल्‍हाधिकार्‍यांना निवेदन !

जिल्‍हाधिकार्‍यांना निवेदन देतांना धर्मप्रेमी

नंदुरबार – हिंदु धर्मियांच्‍या भावना दुखावणार्‍या आणि त्‍यांच्‍या अस्‍मितेवर घाला घालणार्‍या आगामी ‘पठाण’ चित्रपटावर बंदी घालावी आणि चित्रपटगृहात तो प्रदर्शित करू नये, अशी मागणी हिंदु संघटनांच्‍या वतीने करण्‍यात आली आहे. याविषयी जिल्‍हाधिकार्‍यांना निवेदन देण्‍यात आले.

निवेदनात म्‍हटले आहे की,

१. अभिनेता शाहरूख खान यांची प्रमुख भूमिका असलेल्‍या आगामी ‘पठाण’ चित्रपटात हिंदु धर्मियांच्‍या भावना दुखावण्‍याचा प्रयत्न करण्‍यात आला आहे. असा चित्रपट प्रदर्शित करू नये. जर चित्रपट प्रदर्शित झाला, तर कायदा आणि सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो.

२. हिंदी चित्रपटसृष्‍टी, तसेच ‘हॉलीवूड’ यांमध्‍ये सातत्‍याने ‘सनातन धर्माची कशी खिल्ली उडवता येईल ?’, हाच प्रयत्न केला जातो. ‘हिंदु देवतांचा कसा अपमान करता येईल ?’, हीच संधी शोधली जाते. ‘पठाण’ चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी ‘बेशरम रंग’ या गाण्‍यात भगव्‍या रंगाचे अंतर्वस्‍त्र परिधान करून भगव्‍या रंगाचा अवमान केला आहे. हिंदूंच्‍या धार्मिक भावना दुखावण्‍यासाठी हे मुद्दाम केले गेले आहे.

३. जी चित्रपटगृहे हा चित्रपट प्रदर्शित करतील, त्‍यांच्‍यावर प्रशासनाने कठोर कारवाई केली पाहिजे.

सर्वश्री जयदीप चौधरी, मयुर चौधरी, रूपेश माळी, पंकज मराठे, विराज चौधरी, जय माळी, आनंद चौधरी, अविनाश चौधरी, खुशाल भोई, जयेश राजपूत, दर्शन चौधरी, क्रिष्‍णा जयस्‍वाल, क्रिष्‍णा चौधरी, राकेश माळी, गणेश माळी, नरेंद्र गवळी, जय महाले यांनी वरील मागणी केली आहे.