तुळजापूर येथे शिवरायांना भवानी तलवार देतांनाचे १०८ फुटी शिल्प उभारणार ! – राणा जगजितसिंह पाटील, आमदार, भाजप

राणा जगजितसिंह पाटील

धाराशिव – छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देत असलेल्या श्री तुळजाभवानीमातेचे १०८ फुटी शिल्प तुळजापूर येथे उभारण्यात येणार आहे. यासाठी २५० कोटी रुपये व्यय करण्यात येणार आहे. या निधीमध्ये लोकसहभागही असणार आहे. तिरुपती देवस्थानच्या धर्तीवर अन्यही अनेक सुविधा येथे केल्या जाणार आहेत, अशी माहिती श्री तुळजाभवानी मंदिर समितीचे सदस्य आणि तुळजापूर येथील भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ३ डिसेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.

तुळजापूर येथे सध्या १ लाख भाविकांची गर्दी होत आहे. वर्ष २०२४ पर्यंत प्रतिदिन किमान अडीच लाख भाविकांची सोय करता येईल, अशी व्यवस्था करण्यात येत आहे. भाविकांना रहाण्यासाठी सुलभतेने खोल्या उपलब्ध होतील, अशी सोय करण्याचे प्रयत्न आहेत, असेही आमदार पाटील यांनी सांगितले.