काशी आणि तमिळनाडू येथील लोकांचा डी.एन्.ए. एकच ! – संशोधकांचा निष्कर्ष

स्वतःला ‘द्रविड’ मानून देशातील अन्य हिंदूंपासून स्वतःला वेगळे समजणार्‍या तमिळनाडूतील हिंदुद्रोह्यांना चपराक !

मंदिरांमध्ये शुद्धता आणि पावित्र्य जपण्यासाठी भ्रमणभाष संचांवर बंदी !

भ्रमणभाष संच आणि कॅमेरा यांचा वापर न करण्याविषयी नोटीस बोर्डवर सूचना लिहिण्यात आली आहे. तसेच मंदिरात येणार्‍या भक्तांनी योग्य पद्धतीने पोशाख असणे आवश्यक आहे.

चिक्कमगळुरू (कर्नाटक) येथील दत्तपिठासाठी शासनाकडून २ हिंदु पुजार्‍यांची नेमणूक !

हे दत्तपीठ नसून बाबाबुडनगिरी यांचा दर्गा असल्याचा मुसलमानांचा दावा आहे. येथे हिंदु आणि मुसलमान दोघेही दर्शनासाठी येत असतात.

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे ३ मुसलमान तरुणांकडून दलित हिंदु कुटुंबाला घरात घुसून मारहाण

‘उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंना मारहाण करण्याचे धाडस होतेच कसे ?’, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात येतो !

बंगालमध्ये भाजपच्या सभेमध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून हिंसाचार

तृणमूल काँग्रेसकडून बंगालमध्ये सातत्याने भाजपला लक्ष्य केले जात असतांना केंद्रातील भाजप सरकारने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावणेच योग्य ठरील, असेच जनतेला वाटते !

जगामध्ये शांतता निर्माण करण्यासाठी पंतप्रधान मोदी सर्वांना एकत्रित करतील !

एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य ! भारताने जी-२० परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. मी माझे मित्र नरेंद्र मोदी यांच्यावर विश्‍वास करतो की, ते आम्हाला जगात शांतता आणि सशक्त बनवण्यासाठी एकत्र आणतील, असे ट्वीट करत फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वतः एकत्र असलेले एक छायाचित्र पोस्ट केले आहे.

(म्हणे) ‘युद्ध झाल्यास पूर्ण शक्तीनीशी सामना करू !’

गेल्या ७५ वर्षांत पाकने भारताशी केलेल्या चारही युद्धात सपाटून मार खाल्ला आहे. पाकचे २ तुकडेही झाले आहेत. तरीही पाकची खुमखुमी संपलेली नाही. पाकचा संपूर्ण नायनाट जोपर्यंत केला जात नाही, तोपर्यंत हे असेच चालणार !

जगातील सर्वांत प्रदूषित देशांमध्ये भारत ५ व्या क्रमांकावर !

विदेशी आस्थापनांनी सिद्ध केलेले अशा प्रकारचे अहवाल किती खरे असतात, याचाही आता शोध घेण्याची आवश्यकता आहे. पाश्‍चात्त्य देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते, हे जगजाहीर असतांना विकसनशील देशांना प्रदूषणासाठी जाणीवपूर्वक अशा प्रकारे लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे !

पाकिस्तान, चीन, रशिया, सौदी अरेबिया आदी १२ देशांमध्ये होते धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी ! – अमेरिका

यापूर्वी अमेरिकेने भारताविषयीही अशाच प्रकारचे विधान केले होते. त्यावरून भारताने अमेरिकेला खडसावले होते. त्यामुळे अमेरिकेने आता भारताचे नाव घेतलेले नाही, तर जेथे खर्‍या अर्थाने धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी होते, अशा काही देशांची नावे घेतली आहे, हे विशेष !

इस्रायली दिग्दर्शक लॅपिड यांच्या ‘कश्मीर फाइल्स’विषयीच्या विधानाला अन्य ३ परीक्षकांचे समर्थन !

लॅपिड यांनी त्यांच्या विधानावरून क्षमा मागिल्यानंतर आता पुन्हा अशा प्रकारे अन्य ३ परीक्षकांनी म्हणणे म्हणजे हा एका मोठ्या षड्यंत्राचा भाग आहे, असेच वाटू लागले आहे ! याचा आता केंद्र सरकारने शोध घेणे आवश्यक आहे !