येरवडा (जिल्हा पुणे) – येथील रविंदरसिंह राजपुरोहित याने २१ वर्षांपूर्वी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. तेव्हापासून तो पत्नी आणि मुले यांनाही ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी पत्नीला शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता. या प्रकरणी त्याच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यासाठी त्याने घरातील देवतांच्या मूर्ती आणि छायाचित्रे नदीत फेकून दिली. (हिंदु धर्म त्यागून ख्रिस्ती किंवा मुसलमान बनलेले कट्टर हिंदुद्वेषी होतात, याचे उदाहरण ! – संपादक) एका महिलेने याविषयी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
आरोपी राजपुरोहित याने २००१ मध्ये ख्रिस्ती धर्म स्वीकारला. तेव्हापासून राजपुरोहित पत्नीवर ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणत होता. ‘मुलांना ख्रिस्ती धर्माच्या शाळेत पाठवीन’, अशी धमकी आरोपीने पत्नीला दिली होती.
संपादकीय भूमिकावारंवार घडणार्या धर्मांतराच्या घटना रोखून केंद्र सरकारने आतातरी धर्मांतरविरोधी कायदा करणे आवश्यक आहे ! |