हिंदु असल्याचे सांगत मुसलमान युवतीशी हिंदु युवकाचे लावून दिल लग्न !

मुसलमानांची चलाखी जाणा ! ऐनकेन प्रकारेण हिंदु धर्म संपवू पहाणार्‍या अशांपासून हिंदूंनी सावध राहिले पाहिजे ! पोलिसांनी अशांवर कठोर कारवाई केली पाहिजे !

अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना विद्यापिठाने शीख विद्यार्थ्यांना कृपाण (लहान चाकू) धारण करण्यास दिली अनुमती !

शिखांचे १० वे गुरु गोविंद सिंह यांनी शिखांसाठी ५ गोष्टी अनिवार्य केल्या होत्या. यात केस, कडा, कृपाण, कचेरा (अंतर्वस्त्र) आणि कंगवा यांचा समावेश आहे. 

भगवान श्रीराम केवळ हिंदूंचेच नाही, तर सर्वांचे आहेत ! – फारुख अब्दुल्ला

भगवान श्रीराम यांच्या जन्मभूमीवर बांधण्यात आलेला बाबरी ढाचा हटवून ती जागा हिंदूंना द्यावी, असे सर्वांनी उघडपणे पुढे येऊन का सांगितले नाही ?, याचे उत्तर फारुख अब्दुल्ला देतील का ?

धर्मांधाने बलात्काराचा व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देत युवतीकडून ८ लाख रुपये उकळले !

धर्मांधांची वासनांधता आणि गुन्हेगारी वृत्ती जाणा !

जिहादी आतंकवाद्यांचा आदर्श झाकीर नाईक याला कतारकडून आमंत्रण !

कतारमध्ये फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धा भरवण्यात आली आहे. याच्या उद्घाटन समारंभासाठी कतारकडून जिहादी आतंकवाद्यांचा आदर्श असलेला झाकीर नाईक याला आमंत्रित करण्यात आले आहे.

मंगळुरूतील स्फोटामागे जिहादी आतंकवादी !

पोलिसांनी केवळ माहिती देणे नव्हे, तर या आतंकवाद्यांच्या मुसक्या आवळून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित !

इराणमध्ये आंदोलकांनी पेटवले दिवंगत सर्वोच्च धर्मगुरूचे घर !

धार्मिक कट्टरतेमुळे जेव्हा समाजावर बंधने लादली जातात, तेव्हा सरकारच्या जाचाला कंटाळून समाजात अशा प्रकारचा उद्रेक होतो ! त्यामुळे भविष्यात अन्य इस्लामी देशांतही लोकांचा अशा प्रकारे उद्रेक झाल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

खलिस्तानी आतंकवादी हरविंदरसिंह रिंडा याचा पाकिस्तानात मृत्यू

खलिस्तानी आतंकवादी हरविंदरसिंह रिंडा याचा पाकिस्तानात मृत्यू झाला. ड्रग्सच्या अतीसेवनामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तो मूळचा महाराष्ट्रातील नांदेड येथील रहिवासी होता.

नवविवाहित हिंदु-मुसलमान जोडप्याचा विवाहानंतरचा समारंभ स्थानिक धार्मिक संघटनांनी थांबवला !

नवविवाहित हिंदु-मुसलमान जोडप्याचा विवाहानंतरचा समारंभ (रिसेप्शन) स्थानिक धार्मिक संघटनांनी थांबवले. एका खासगी वृत्तवाहिनीच्या संपादकाने यासंदर्भात ट्वीट प्रसारित केले होते. त्याने टि्वटरवर ‘लव्ह जिहाद’ हा ‘हॅशटॅग’ वापरून ‘ट्रेंड’ केला.

मुस्लिम पर्सनल लॉ’नुसार झालेले लग्न ‘पॉक्सो’ कायद्याच्या कक्षेच्या बाहेर नाही ! – केरळ उच्च न्यायालय

मुसलमानांचे ‘मुस्लिम पर्सनल लॉ’च्या अंतर्गत झालेले लग्न ‘पॉक्सो’ कायद्याच्या कक्षेबाहेर नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्वाळा देत केरळ उच्च न्यायालयाने खालिदूर रहमान (वय ३१ वर्षे) याची जामीन याचिका फेटाळून लावली.