हिंदु असल्याचे सांगत मुसलमान युवतीशी हिंदु युवकाचे लावून दिल लग्न !

दोन मुले झाल्यानंतर आता हिंदु युवकावर धर्मांतरासाठी दबाव

उज्जैन (मध्यप्रदेश) – हिंदु असल्याचे सांगत मुसलमान मुलीशी लग्न लावून दिल्याचा प्रकार येथे घडला. या दांपत्याला २ मुले झाल्यानंतर आता मुसलमान तरुणी आणि तिची आई या दोघी मिळून हिंदु युवकाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवत त्याच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणत आहेत. या प्रकराला कंटाळून अंततः पीडित हिंदु युवकाने उज्जैन पोलीस ठाण्यात त्याची पत्नी आणि सासू यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे.

विवाह जुळवणार्‍या एका दलालाने वर्ष २०१९ मध्ये उज्जैन येथील श्रीकृष्ण कॉलनीत रहाणार्‍या ३४ वर्षीय हिंदु तरुणाचा मुस्कान नावाच्या एका मुसलमान तरुणीशी ती हिंदु असल्याचे खोटे सांगून विवाह लावून दिला. त्यांना २ मुले झाल्यानंतर मुस्कान आणि तिची आई यांनी हिंदु तरुणाला धर्मांतर करण्यास सांगितले. त्यास त्याने नकार दिल्यावर त्यांनी घटस्फोटासाठी कागपत्रांवर त्याच्याकडून बलपूर्वक स्वाक्षरी घेतली. ‘मुस्कान हिचे संपूर्ण कुटुंब हिंदु युवकांना अशा प्रकारे फसवण्याचे षड्यंत्र रचत आहे’, अशी माहिती पीडित युवकाने पोलिसांना दिली.

संपादकीय भूमिका

  • मुसलमानांची चलाखी जाणा ! ऐनकेन प्रकारेण हिंदु धर्म संपवू पहाणार्‍या अशांपासून हिंदूंनी सावध राहिले पाहिजे ! पोलिसांनी अशांवर कठोर कारवाई केली पाहिजे !