अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना विद्यापिठाने शीख विद्यार्थ्यांना कृपाण (लहान चाकू) धारण करण्यास दिली अनुमती !

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना विद्यापिठाने शस्त्र धोरणात पालट करून शीख विद्यार्थ्यांना विद्यापिठात कृपाण (लहान चाकू) धारण करण्यास अनुमती दिली आहे. २ मासांपूर्वी एका शीख विद्यार्थ्याला नॉर्थ कॅरोलिना विद्यापिठात कृपाण बाळगून गेला होता. त्याला ते काढण्यास सांगितल्यानंतर त्याने नकार दिल्याने त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता धोरणात पालट करून ही अनुमती देण्यात आली आहे.

१. विद्यापिठाचे कुलपती शेरॉन एल्. गॅबर आणि मुख्य अधिकारी ब्रँडन एल्. वुल्फ म्हणाले की, कृपाण घेऊन जाणार्‍या विद्यार्थ्याच्या अटकेसाठी आम्ही दिलगीर आहोत. नवीन विद्यापिठाच्या धोरणासाठी घेतलेल्या निर्णयाची तत्काळ कार्यवाही करण्यात आली आहे.

२. शिखांचे १० वे गुरु गोविंद सिंह यांनी शिखांसाठी ५ गोष्टी अनिवार्य केल्या होत्या. यात केस, कडा, कृपाण, कचेरा (अंतर्वस्त्र) आणि कंगवा यांचा समावेश आहे.