जिहादी आतंकवाद्यांचा आदर्श झाकीर नाईक याला कतारकडून आमंत्रण !

कतारमधील फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धा

झाकीर नाईक

दोहा (कतार) – कतारमध्ये फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धा भरवण्यात आली आहे. याच्या उद्घाटन समारंभासाठी कतारकडून जिहादी आतंकवाद्यांचा आदर्श असलेला झाकीर नाईक याला आमंत्रित करण्यात आले आहे. झाकीर तेथे पोचल्याचीही माहिती समोर आली आहे. झाकीर नाईक भारतासाठी पसार आरोपी असून सध्या तो मलेशियामध्ये रहात आहे.

सौजन्य हिंदुस्थान टाईम्स

झाकीर नाईक याने कतार येथे पोचल्यावर सामाजिक माध्यमांतून पोस्ट करून सांगितले की, फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेच्या काळात तो येथे इस्लामवर धार्मिक व्याख्यान देणार आहे.