धर्मांधाने बलात्काराचा व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देत युवतीकडून ८ लाख रुपये उकळले !

उत्तरप्रदेशमधील घटना

प्रतिकात्मक छायाचित्र

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – धर्मांधाने युवतीवर बलात्कार करून, तसेच त्याचा व्हिडिओ बनवून तो प्रसारित करण्याची धमकी देत तिच्याकडून ८ लाख रुपये उकळल्याचे उघड झाले आहे. यासह त्याने लाखो रुपये किमतीचे युवतीचे दागिनेही हडपले आहेत. महंमद कैफ असे या नराधमाचे नाव आहे. ३ वर्षांपासून चालू असलेल्या या प्रकाराला कंटाळून अंततः पीडितेने अलींगज पोलीस ठाण्यात १७ नोव्हेंबर या दिवशी कैफ याच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

संपादकीय भूमिका

  • धर्मांधांची वासनांधता आणि गुन्हेगारी वृत्ती जाणा !