देवता-राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले आणि चिनी फटाके यांच्या विक्रेत्यांवर कारवाई करण्याची हिंदुत्वनिष्ठांची मागणी !

देवता-राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेल्या फटाके विक्रेत्यांवर कारवाई करावी, तसेच चिनी बनावटीच्या फटाक्यांची विक्री करणार्‍यांवर तात्काळ योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी शिरोली पुलाची येथे साहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील यांना दिले.

हलाल प्रमाणपत्र व्यवस्था बंद करा !

धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित हलाल प्रमाणपत्र व्यवस्था तात्काळ बंद करावे आणि असे प्रमाणपत्र देणार्‍या सर्व संस्थांचे अन्वेषण करण्यात यावे, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बेळगाव येथे २१ ऑक्टोबरला हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रविरोधी ‘वक्फ कायदा’ त्वरित रहित करा !

वक्फ कायद्याचा दुरुपयोग करून देशभरात बलपूर्वक भूमी बळकावून ‘लँड जिहाद’ केला जात आहे. हा देशविरोधी वक्फ कायदा त्वरित रहित करण्यात यावा, अशी मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी राहुल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

हिंदूंना हलालविरहित पदार्थ उपलब्ध न केल्यास ‘मॅकडोनाल्ड’, ‘के.एफ्.सी.’ आणि हल्दीराम यांच्या खाद्यपदार्थांवर बहिष्कार घालू !

हिंदु समाजासाठी हलाल नसलेले पदार्थ उपलब्ध करून द्यावेत; अन्यथा देशभरात ‘मॅकडोनाल्ड’, के.एफ्.सी. आणि हल्दीराम या आस्थापनांच्या खाद्यपदार्थांवर बहिष्कार घालण्यात येईल, अशी चेतावणी ठाणे येथील ‘हलाल सक्ती विरोधी कृती समिती’च्या वतीने देण्यात आली आहे.

राज्यातील फटाके बाजारात ९५ टक्के ‘ग्रीन (पर्यावरणपूरक) फटाके’ !

फटाक्यांमुळे दिवाळीत काही शहरांमध्ये निर्माण झालेल्या धुराच्या ढगांमुळे सर्वोच्च न्यायालयाने केवळ पर्यावरणपूरक फटाकेच सिद्ध करण्याचा आदेश वर्ष २०१८ मध्ये दिला होता.

एस्.टी.ला निवृत्तीवेतनावरच जगवणार का ?

‘सरकारला एस्.टी. महामंडळाला खरोखरच सक्षम करायचे आहे का ?’, येथूनच या प्रश्नाचा प्रारंभ चालू होतो. मागील काही वर्षांचा एस्.टी. महामंडळाचा कारभार पाहिला, तर ‘तिला डबघाईला आणण्याचा प्रयत्न चालू आहे का ?’, असा प्रश्न पडतो. ‘एस्.टी.ला जगवायचे कि मारायचे आहे ?’, या सरकारच्या धोरणावर एस्.टी.चे पुनरुत्थान अवलंबून आहे.

सातारा येथे नागरी वस्तीतील खासगी जागेत फटाक्यांची विक्री !

दिवाळीच्या निमित्ताने शहरातील नागरी वस्तीतील खासगी जागेत फटाक्यांची विक्री राजरोसपणे चालू आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याला उत्तरदायी कोण ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.

गोरक्षकांनी वाचवले १३ गायींचे प्राण !

गोवंशहत्या बंदी कायद्याची कार्यवाही कठोरतेने होत नसल्यानेच असे वारंवार घडते !

हिंदूंचा पैसा हिंदूंच्याच नाशासाठी !

पाकिस्तानमधील पूरग्रस्तांना साहाय्य करण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये एका दिवाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यातून मिळणारा पैसा पाकमधील ‘अल् खिदमत फाऊंडेशन’ या जिहादी संघटना ‘जमात-ए-इस्लामी’च्या धर्मादाय शाखेला देण्यात येणार आहे.

फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण : एक विनाशकारी नरकासूर !

सर्वांत वाईट गोष्ट, म्हणजे फटाक्यांचे प्रदूषण झाडे लावून अल्प होऊ शकत नाही. फटाके फोडण्यातून निर्माण होणारा धूर कागद, लाकडे किंवा काडीकचरा यांच्या धुरासारखा साधा नसतो.