राष्ट्रविरोधी ‘वक्फ कायदा’ त्वरित रहित करा !

जळगाव येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांची आंदोलनाद्वारे मागणी !

जळगाव येथील निवासी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी

जळगाव, २२ ऑक्टोबर (वार्ता.) – स्वातंत्र्यानंतरही मुसलमानांचे लांगूलचालन करणार्‍या काँग्रेस सरकारने वक्फ कायद्यात वेळोवेळी सुधारणा करत ‘वक्फ बोर्डा’ला पाशवी अधिकार दिले. वर्ष १९९५ आणि वर्ष २०१३ मध्ये काँग्रेस सरकारने या कायद्यात सर्व धर्मियांची कोणतीही संपत्ती ही वक्फ बोर्डाची संपत्ती म्हणून घोषित करण्याचे भयानक अधिकार वक्फ बोर्डाला दिले. कायद्याचा दुरुपयोग करून देशभरात बलपूर्वक भूमी बळकावून ‘लँड जिहाद’ केला जात आहे. हा देशविरोधी वक्फ कायदा त्वरित रहित करण्यात यावा, अशी मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी राहुल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

मागील काही दिवसांत धर्मांध शक्तींनी ‘सर तन से जुदा’ हे गाणे वाजवणे, घोषणा देणे असे प्रकार जाणीवपूर्वक चालू केले आहेत. असे करण्यावर जिल्ह्यात बंदी घालण्यात यावी, तसेच संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. या वेळी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे श्री. गजानन माळी, श्री शिवतेज प्रतिष्ठानचे श्री. दीपक दाभाडे उपस्थित होते.

आंदोलनाच्या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केलेले विचार !

१. वक्फ संपत्तीची चौकशी करण्याविषयी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना सांगीन ! – श्री. सुरेश (राजूमामा) भोळे, आमदार

२. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्यात वक्फ बोर्ड कार्यालय असावे, अशी मागणी केली आहे. या कायद्याद्वारे आतापर्यंत ज्या हिंदूंच्या भूमी बळकावण्यात आल्या, त्या हिंदूंना परत कराव्यात, अशीही मागणी करत आहोत. – श्री. मोहन तिवारी, उत्तर महाराष्ट्र संघटन, प्रमुख हिंदु राष्ट्र सेना

३. मातृभूमीचे लचके तोडले जात आहेत, हे हिंदू कदापि सहन करणार नाहीत. संघटितपणे या कायद्याविरोधात लढा उभारून शासनाकडे निवेदन देऊ. – श्री. आकाश फडे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, जळगाव

४. ग्रामीण स्तरावर कीर्तनाच्या माध्यमातून कायद्याविरोधात जनजागृती करू. – ह.भ.प. वरसाडेकर महाराज

५. कायदा अनैतिक वाटतो. त्याविरोधात आपण संघटित होऊन लढा द्यायला हवा. – कु. पद्मश्री सोनार

६. राष्ट्र-धर्म यांवरील आघातांविरोधात सर्व संप्रदायांनी एकत्रित येणे आवश्यक ! – श्री. अनिल चौधरी, योग वेदांत सेवा समिती

७. वक्फ कायदा रहित होईपर्यंत हिंदू महासभा याचा पाठपुरावा करील. – अधिवक्ता गोविंद तिवारी, महाराष्ट्र्र प्रदेश अध्यक्ष, हिंदु महासभा

यवतमाळ येथेही निवेदने !

यवतमाळ येथे निवेदन स्वीकारतांना नियोजन अधिकारी सौ. रूपाली बेहरे

दिग्रस (जिल्हा यवतमाळ) – येथेही वरील स्वरूपाच्या मागणीचे निवेदन तहसीलदार प्रवीण धानोरकर यांना देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती मंच, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, हिंदु जनजागृती समिती या संघटनांचे कार्यकर्ते, तसेच पत्रकार, धर्मप्रेमी, योगप्रचारक उपस्थित होते.

यवतमाळ येथे याच मागणीच्या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने नियोजन अधिकारी सौ. रूपाली बेहरे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी श्रीराम जन्मोत्सव समिती, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, योग वेदांत सेवा समिती, हिंदु जनजागृती समिती इत्यादी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.