हिंदूंना हलालविरहित पदार्थ उपलब्ध न केल्यास ‘मॅकडोनाल्ड’, ‘के.एफ्.सी.’ आणि हल्दीराम यांच्या खाद्यपदार्थांवर बहिष्कार घालू !

ठाणे येथील ‘हलाल सक्ती विरोधी कृती समिती’ची चेतावणी !

ठाणे, २२ ऑक्टोबर (वार्ता.) – हिंदु समाजासाठी हलाल नसलेले पदार्थ उपलब्ध करून द्यावेत; अन्यथा देशभरात ‘मॅकडोनाल्ड’, के.एफ्.सी. आणि हल्दीराम या आस्थापनांच्या खाद्यपदार्थांवर बहिष्कार घालण्यात येईल, अशी चेतावणी ठाणे येथील ‘हलाल सक्ती विरोधी कृती समिती’च्या वतीने देण्यात आली आहे. या आस्थापनांच्या उपाहारगृह आणि विक्री केंद्रांवर समितीच्या वतीने ही निवेदने देण्यात आली. निवेदन देतांना धर्मप्रेमी श्री. शंकर विश्वकर्मा, श्री. सुनील धामणकर आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील कदम उपस्थित होते.