पर्यावरणपूरक फटाके सिद्ध करण्याच्या न्यायालयाच्या आदेशाचा परिणाम !
नागपूर – फटाक्यांमुळे दिवाळीत काही शहरांमध्ये निर्माण झालेल्या धुराच्या ढगांमुळे सर्वोच्च न्यायालयाने केवळ पर्यावरणपूरक फटाकेच सिद्ध करण्याचा आदेश वर्ष २०१८ मध्ये दिला होता. त्यानुसार ‘नॅशनल एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट’ अर्थात ‘नीरी’द्वारे या पर्यावरणपूरक फटाक्यांच्या निर्मितीचा साचा सिद्ध करण्यात आला आहे. यामुळे यंदा फटाका बाजारात विक्रीसाठी आलेल्या फटाक्यांमध्ये ‘ग्रीन फायरवर्क्स’ असे चिन्ह छापलेले फटाके ९५ टक्के प्रमाणात उपलब्ध आहेत.
संपादकीय भूमिकाफटाक्यांच्या उत्पादनावरच न्यायालय बंदी का घालत नाही ? |