दिवाळीचे धार्मिक, सामाजिक, आर्थिक, आरोग्य आणि कला या दृष्टीकोनातून महत्त्व !
सणांच्या व्यवस्थापनात सतत परमेश्वराचे स्मरण, कीर्तन, जप, पूजा, आराधना आणि सेवा या योगे मनात सात्त्विक भाव जागृत ठेवावा, यांवर भर दिला आहे. ‘धर्मो रक्षति रक्षित:’, म्हणजे धर्माचे रक्षण करणार्याचे धर्म, म्हणजेच ईश्वर रक्षण करतो. ही आपली प्राचीन धारणा आहे.