‘राजीव गांधी फाऊंडेशन’कडून आर्थिक अपव्यवहार झाल्याने विदेशी अनुदान अनुज्ञप्ती रहित !

केंद्रीय गृहमंत्रालयाची मोठी कारवाई !
चीनकडून मिळत होते अर्थसाहाय्य !
सोनिया गांधी आहेत संस्थेच्या अध्यक्षा

सर्वांत वजनदार रॉकेट ‘एल्.व्ही.एम्. ३’चे इस्त्रोने केले यशस्वी प्रक्षेपण !

याद्वारे ‘वन वेब’ या आस्थापनाचे ३६ उपग्रह अवकाशात सोडण्यात आले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन २४ ऑक्टोबरला साजरी करणार दिवाळी !

उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस आणि पूर्व राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वसुबारस या दिवशी साजरी केली दिवाळी !

‘अ‍ॅमेझॉन’ हिंदूंच्या धर्मांतरासाठी पैसे पुरवत असल्याचा आरोप !

स्वयंसेवी संस्थेने केलेल्या तक्रारीनंतर राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने बजावली नोटीस !

मुलांना साधना न शिकवल्याचा परिणाम !

‘म्हातारपणी मुले लक्ष देत नाहीत’, असे म्हणणार्‍या वृद्धांनो, तुम्ही मुलांवर साधनेचे संस्कार केले नाहीत, याचे ते फळ आहे. याला मुलांबरोबर तुम्हीही उत्तरदायी आहात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बेळगाव शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया होत नसल्याने बेळगाव महापालिकेला १ कोटी ८० लाख रुपयांचा दंड !

बेळगाव शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया होत नसल्याने राज्य शासनाच्या विधीमंडळ समितीने बेळगाव महापालिकेला १ कोटी ८० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. राज्याच्या विधीमंडळ समितीची बेंगळुरू येथे बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.

सातारा येथे भाजपकडून शिवराज पाटील-चाकूरकर यांच्या विरोधात ‘जोडे मारा आंदोलन’ !

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांनी भगवद्गीतेचा संदर्भ देत भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्याविषयी अयोग्य विधाने केली. याचा निषेध करत सातारा येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवतीर्थावर (पोवईनाका येथे) पाटील यांच्या प्रतिमेला ‘जोडे मारा आंदोलन’ केले.

वर्धा येथील परिवहन विभागाच्या पडताळणी मोहिमेत ५३ वाहने दोषी !

प्रवाशांचा प्रवास वाहनांतून सुरक्षित होण्यासाठी येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून वाहनांची पडताळणी मोहीम राबवण्यात येत आहे. ११ दिवसांच्या मोहिमेत इतर जिल्ह्यांसह वर्धा जिल्ह्यातील तब्बल ५३ वाहने दोषी आढळली असून त्यांच्याकडून ६ सहस्र रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

बदलापूर येथील कोंडेश्वर कुंडात बुडून ४ तरुणांचा मृत्यू !

पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. या प्रकरणी कुळगाव पोलीस ठाणे येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.