गोरक्षकांनी वाचवले १३ गायींचे प्राण !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुरुगुड (जिल्हा कोल्हापूर) – कर्नाटकातील पशूवधगृहाकडे गायी घेऊन जाणारे २ टेंपो गोरक्षक श्री. तुकाराम मांडवकर आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी पकडून पोलिसांच्या कह्यात दिले. या प्रकरणी १३ गायी, २ टेंपो, एक बोलेरो गाडी असा ५ लाख ५५ सहस्र रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. प्रशांत माळी, अविनाश स्वामी आणि दिलीप स्वामी यांना कह्यात घेतले आहे. (गोवंशहत्या बंदी कायद्याची कार्यवाही कठोरतेने होत नसल्यानेच असे वारंवार घडते ! – संपादक)