पुणेकरांना पुढील ७ मास रस्ते खोदाईला सामोरे जावे लागणार !
वारंवार रस्त्यांची खोदाई का केली जाते ? हे पहाणे आवश्यक आहे. यामध्ये नियोजनाचा अभाव आणि कामाविषयी अनास्था तर नाही ना ? हेही पहायला हवे.
वारंवार रस्त्यांची खोदाई का केली जाते ? हे पहाणे आवश्यक आहे. यामध्ये नियोजनाचा अभाव आणि कामाविषयी अनास्था तर नाही ना ? हेही पहायला हवे.
आदिपुरुष चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. या चित्रपटाचा फक्त ‘टीझर’ आलेला आहे; मात्र टीझर पाहून अनेक लोकांनी आक्षेप व्यक्त केला आहे. हे टीझर पाहून आमच्याही मनात काही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.’चे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांना ‘ब्राह्मण जागृती सेवा संघ’ यांच्या वतीने ‘दाजीकाका गाडगीळ उद्योगरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतीय सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष आणि खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना देण्यात आला.
मंदिरातील मूर्ती चोरीच्या घटना वारंवार घडत असतांना पोलिसांना चोरांचा सुगावा कसा लागत नाही ? पोलीस गांभीर्याने या प्रकरणांचे अन्वेषण करत नाहीत का ?
राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथे रात्रीच्या वेळी आरोग्य विभागातील अधिकार्यांनी धाडसत्र कारवाई चालू केली आहे. पुणे जिल्ह्यातील आळंदी, वाघोली येथील ग्रामीण रुग्णालयांत तपासणी करण्यात आली.
टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) परीक्षेतील घोटाळ्यात जे दोषी आढळले त्यांना पुन्हा परीक्षा देता येईल. काही वर्षांनी त्यांना सुधारण्याची संधी दिली जाईल; मात्र त्याआधी आता जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, आरोग्य विभागात ‘अकाऊंटिबिलिटी’ची (दायित्वाची) आवश्यकता आहे.
नाशिक जिल्हा रुग्णालयातील बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणी केंद्रीय आरोग्य सचिवांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणातील तत्कालीन अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे यांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने ६ ऑक्टोबर या दिवशी राखून ठेवला.
दिवाळीच्या वेळी तात्पुरत्या स्वरूपात फटाका आणि शोभेची दारू विक्री करण्यासाठी परवाने संमत केले जातात. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त कार्यालयाने महापालिकेच्या स्तरावर मान्य धोरणांची काटेकोर कार्यवाही करण्यासंदर्भात संबंधित विभागांना आदेश दिले आहेत.
‘आताच्या पिढीची आवड वेगळी आहे’, असे गृहित धरून तिच्यासमोर वेगळ्या अंगाने रामायण मांडण्याचा प्रयत्न जर कुणी करत असेल, तर ‘तो अज्ञानीच आहे’, असे म्हणावे लागेल. अशा अज्ञानींना योग्य ज्ञान करवून देण्यासाठी धर्माभिमानी हिंदूंनी घेतलेला पुढाकार योग्य म्हणावा लागेल ! आधुनिकतेच्या नावाखाली हिंदूंच्या देवतांचे अयोग्य चित्रण अस्वीकारार्ह !