ओम राऊत यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी  !

विश्व हिंदु परिषदेचे प्रवक्ते श्रीराज नायर यांची मागणी

मुंबई – मागील काही काळापासून चित्रपट क्षेत्रातील एका वर्गाकडून हिंदूंच्या देवतांवर टीका केली जात आहे, तसेच हिंदु आचार-विचार, साधू यांची खिल्ली उडवली जात आहे. आदिपुरुष चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. या चित्रपटाचा फक्त ‘टीझर’ आलेला आहे; मात्र टीझर पाहून अनेक लोकांनी आक्षेप व्यक्त केला आहे. हे टीझर पाहून आमच्याही मनात काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक यांनी लोकांच्या भावनेशी खेळू नये. त्यांनी तात्काळ आपली भूमिका स्पष्ट करायला हवी, असे विश्व हिंदु परिषदेचे प्रवक्ते श्रीराज नायर यांनी म्हटले आहे.

विश्व हिंदु परिषदेचे प्रवक्ते श्रीराज नायर

याआधी काही चित्रपटांमध्ये विश्व हिंदु परिषदेने अत्यंत प्रेमळपणे दुरुस्त्या सुचवलेल्या आहेत. या चित्रपटात भगवान श्रीराम यांच्या पात्राविषयी वाद आहे. व्हिएफ्एक्स, तसेच तंत्रज्ञान यांच्या नावाखाली पौराणिक कथांचे महत्त्व न्यून केले जाऊ शकत नाही, अशीही भूमिका विश्व हिंदु परिषदेने घेतली आहे.