टीईटी परीक्षेतील घोटाळ्यात दोषी आढळलेल्यांना पुन्हा परीक्षा देता येईल ! – शिक्षणमंत्री केसरकर

पुणे – टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) परीक्षेतील घोटाळ्यात जे दोषी आढळले त्यांना पुन्हा परीक्षा देता येईल. काही वर्षांनी त्यांना सुधारण्याची संधी दिली जाईल; मात्र त्याआधी आता जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले आहे. ते पुणे येथे बोलत होते.

शिक्षणमंत्री केसरकर म्हणाले, ‘‘मी कोणत्याच विद्यार्थ्याची किंवा शिक्षकाची हानी होऊ देणार नाही. पोलिसांच्या अन्वेषणात जे शिक्षक दोषी ठरले आहेत, त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईल. त्यांना वगळून परीक्षेचा निकाल येत्या काहीच दिवसांत घोषित केला जाईल; मात्र ज्या शिक्षकांनी प्रामाणिकपणे ही परीक्षा दिली आहे त्यांनाही योग्य न्याय मिळेल.’’