मिळकत कराची थकबाकी असलेल्या २१ मालमत्ता शासनाधीन !

१ लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या सदनिका धारकांवरही कारवाई करण्याचे नियोजन केले आहे, असे साहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.

खेड शिवापूर (पुणे) येथील ‘क्राफ्ट पॉवरकॉन’ आस्थापनामध्ये सनातन संस्थेच्या वतीने प्रवचन !

‘अध्यात्मानेच व्यक्तीमध्ये पालट होऊ शकतो. आजच्या काळात साधनेविना पर्याय नाही. तुम्ही प्रत्येक मासाला व्याख्यान, आध्यात्मिक प्रवचन घेऊ शकता’, असा उत्स्फूर्त अभिप्राय ‘क्राफ्ट पॉवरकॉन’च्या व्यवस्थापकीय संचालकांनी दिला.

शिवचरित्राच्या पारायणातून सुवर्ण भारताचा ध्यास लागेल आणि त्यातून भारत समृद्ध होईल ! – डॉ. प्रमोद बोराडे, इतिहास अभ्यासक

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यापासून प्रेरणा घेत नवी पिढी राष्ट्रप्रेमी, कर्तृत्ववान घडावी या उद्देशाने नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने शिवशाही परिवाराच्या वतीने तळेगाव दाभाडे येथे शिवचरित्राचे ७ दिवस पारायण करण्यात आले.

कुर्ला येथील नाल्यात तरुणीचा मृतदेह मिळाला !

पतीसमवेत अनैतिक संबंध असणार्‍या तरुणीची हत्या करून तिचा मृतदेह हात-पाय बांधून गोणीमध्ये घालून नाल्यात टाकल्याची घटना दोन दिवसांपूर्वी कुर्ला येथे घडली. नेहरूनगर पोलिसांनी तपास करून तीन महिलांना अटक केली असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

‘आप’चा हिंदुद्वेष जाणा !

देहलीच्या ‘आप’ सरकारमधील समाजकल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा देण्यात आली. या वेळी ‘हिंदु देवतांची पूजा करणार नाही आणि त्यांना देव मानणार नाही’, अशी शपथ देण्यात आली.

भारताचे दुसरे ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ (संरक्षणप्रमुख) लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची नियुक्ती देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आशादायी !

जनरल चौहान यांची नियुक्ती हा अतिशय चांगला निर्णय आहे. त्यासाठी शासनाचे कौतुक करायला हवे. ही नियुक्ती आणखी लवकर झाली असती, तर निश्चितच चांगले झाले.

कृतघ्नपणा !

विदेशात रहाणार्‍या भारतीय लोकांवर तेथील लोक द्वेषमूलक टीका करत आहेत  त्यांना ‘परत भारतात जा’, असे सांगत आहेत. यात दोष कुणाचा आहे ? स्वतःचा अपमान करून घ्यायला आपण इतर देशात का जातो ? आणि नंतर आपण साहाय्यासाठी भारत सरकारकडून अपेक्षा करतो !

विदेशी गांडुळापासून बनवलेले गांडूळ खत वापरू नका !

विदेशी गांडुळांच्या विष्ठेत पारा, शिसे यांसारखे विषारी धातूंचे अंश असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. हे विषारी अंश गांडूळ खतावर पिकवलेल्या पिकांच्या माध्यमातून मानवी शरिरात प्रवेश करू शकतात. यामुळे विदेशी गांडुळांपासून बनवलेले गांडूळ खत वापरणे धोकादायक आहे.

चित्रांमध्ये पावित्र्य, उज्ज्वलता आणि सूक्ष्म भाव जपणारे जगप्रसिद्ध चित्रकार राजा रवि वर्मा !

उद्या आश्विन पौर्णिमा या दिवशी (९.१०.२०२२) या दिवशी) भारतातील जगप्रसिद्ध चित्रकार राजा रवि वर्मा यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने…

चीनची नामुष्कीजनक माघार हा भारताचा लष्करी आणि राजनैतिक दृष्टीने मोठा विजय !

विस्तारवादी चीनची मानसिकता ओळखून भारत सरकार आणि नागरिक यांनी सदैव सतर्क रहाणे आवश्यक !