रात्रीच्या वेळी डॉक्टर रुग्णालयात उपस्थित नसल्यास त्यांना थेट निलंबित करणार ! – तुकाराम मुंढे, आयुक्त

तुकाराम मुंढे

पुणे – रात्रीच्या वेळी डॉक्टर रुग्णालयात उपस्थित नसल्यास अशा त्यांना थेट निलंबित केले जाणार आहे, असा निर्णय आरोग्य विभागाच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. पुण्यात आरोग्य विभागाच्या या कारवाईच्या वेळी डॉक्टर, नर्स उपस्थित असल्याने कारवाई टळली आहे. राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथे रात्रीच्या वेळी आरोग्य विभागातील अधिकार्‍यांनी धाडसत्र कारवाई चालू केली आहे. पुणे जिल्ह्यातील आळंदी, वाघोली येथील ग्रामीण रुग्णालयांत तपासणी करण्यात आली.

तुकाराम मुंढे यांनी काही दिवसांपूर्वी आयुक्त आरोग्य सेवा आणि संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या आरोग्याची सेवा करण्यासाठी तत्पर रहाण्याच्या सूचना त्यांनी वैद्यकीय कर्मचार्‍यांना दिल्या होत्या; मात्र काही दिवसांत धडाकेबाज अधिकारी असलेल्या तुकाराम मुंढे यांनी कारवाईचा तडाखा लावला.