‘पितांबरी’चे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांना ‘दाजीकाका गाडगीळ उद्योगरत्न’ पुरस्कार !

ठाणे – ‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.’चे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांना ‘ब्राह्मण जागृती सेवा संघ’ यांच्या वतीने ‘दाजीकाका गाडगीळ उद्योगरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतीय सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष आणि खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना देण्यात आला.

या वेळी ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांना ‘समाजस्नेह’ पुरस्कार, ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांना ‘समाजभूषण’ पुरस्कार, तर अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांना ‘युवा गौरव’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

या प्रसंगी डॉ. सहस्रबुद्धे यांनी पितांबरी समुहाचे संस्थापक कै. वामनराव प्रभुदेसाई आणि श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या उद्योजकीय वाटचालीसमवेत सामाजिक अन् सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचाही गौरव केला.

या सन्मानाला उत्तर देतांना श्री. प्रभुदेसाई म्हणाले, ‘‘व्यावसायिक प्रगतीसमवेत आपण समाजाचेही काही देणे लागतो, याचे भान ‘पितांबरी’ने कायम ठेवले आहे. त्यामुळेच ‘पितांबरी’ची वाटचाल यशस्वीपणे चालू आहे.’’

या वेळी ब्राह्मण जागृती संघाचे अध्यक्ष श्री. अंकित काणे, ज्येष्ठ भविष्यकार पं. अतुलशास्त्री भगरे आदी मान्यवरांसह संस्थेचे सदस्य आणि समाजातील मान्यवर उपस्थित होते.