घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याविषयी मंत्री अतुल सावे यांचा सकारात्मक प्रतिसाद !

महात्मा जोतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेमध्ये (‘महाज्योती’) विद्यार्थ्यांसाठीच्या ‘टॅबलेट’ खरेदीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला होता.

लंपीचा संसर्ग रोखण्यासाठी पशूसंवर्धन विभागातील १ सहस्र ५०० रिक्त पदे तातडीने भरणार !

तहान लागल्यावर विहीर खोदणारे अकार्यक्षम प्रशासन जनहित काय साधणार ?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश !

२ आठवड्यांत कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश  !

नागपूर येथे ‘सनातन प्रभात’च्या वाचक मेळाव्यांना चांगला प्रतिसाद !

हिंदु राष्ट्र स्थापनेची संकल्पना समाजमनात बिंबवणे, हिंदूंवरील अन्यायाला वाचा फोडणे आणि त्यावर उपाययोजना सांगून हिंदूंचे संघटन करणे यांसाठी ‘सनातन प्रभात’ गेल्या २ दशकांहून अधिक काळ अविरतपणे कार्य करत आहे.

ख्रिस्त्यांचे उदात्तीकरण का ?

देवीच्या मंडपात शिरतांना समोर चर्चच्या केंद्राची प्रतिकृती दिसत असेल, तर भाविकांच्या मनात देवीविषयीचे प्रेम, तिची भक्ती, भक्तीचा जागर यांच्याविषयीचे विचार तरी कुठून येणार ? उलट त्यांचे ख्रिस्तीप्रेमच उफाळून येईल. आयोजकांनाही हेच हवे आहे ना ? यातूनच यात सहभागी असणाऱ्या सर्वांच्या धर्माभिमानशून्यतेची प्रचीती येते !

संभाजीनगर येथे विवाहित महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधावर गुन्हा नोंद !

स्वतःला अल्पसंख्यांक म्हणवणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !

खलिस्तानवाद नष्ट करण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक !

भारतापासून वेगळ्या खलिस्तानच्या निर्मितीसाठी कॅनडातील टोरंटोमधील खलिस्तानवाद्यांनी जनमत संग्रह घेतल्याचा दावा केला आहे. यासाठी १ लाख १० सहस्र लोकांनी मतदान केल्याचे सांगण्यात येत आहे.

पितृपक्ष : धर्मशास्त्रीय आधार असलेला श्रद्धेचा विषय !

पितृपक्षातील ‘श्राद्ध’ हा धर्मशास्त्रीय आधार असलेला श्रद्धेचा विषय आहे. यासाठी धर्मशिक्षण घेऊन या विधींची अनुभूती घेऊया. जर कुणी विनोद करत असेल, तर त्याचेही प्रबोधन करून धर्मरक्षण करूया !

साधना चांगली होण्यासाठी आयुर्वेदानुसार आचरण करण्याची आवश्यकता

ईश्वरप्राप्तीच्या वाटेवर मार्गक्रमण करणाऱ्या प्रत्येक साधकाने ‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् ।’ म्हणजे ‘शरीर असेल, तरच धर्म किंवा साधना करणे शक्य होते’, हे सूत्र लक्षात ठेवायला हवे. साधनेसाठी शरीर निरोगी हवे. यासाठी आयुर्वेदानुसार आचरण करायला हवे.