#Datta Datta #दत्त दत्त #श्रीदत्त श्रीदत्त #ShriDatta ShriDatta #mahalaya mahalaya #महालय महालय #pitrupaksha pitrupaksha #पितृपक्ष पितृपक्ष #shraddha shraddha #श्राद्ध श्राद्ध #ShraddhaRituals Shraddha rituals #श्राद्धविधी श्राद्धविधी #Shraddhavidhi Shraddha vidhi
सध्या पितृपक्ष चालू आहे. व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या आत्म्याला सद्गती मिळावी; म्हणून श्राद्ध करणे हे हिंदु धर्माचे एक वैशिष्ट्य आहे. पितरांसाठी श्राद्ध न केल्यास त्यांच्या इच्छा अतृप्त राहिल्यामुळे कुटुंबियांना त्रास होण्याची शक्यता असते. श्राद्धामुळे पितरांचे रक्षण होते, त्यांना गती मिळते आणि आपले जीवनही सुसह्य होते. पितृपक्षात एक दिवस पितरांचे श्राद्ध केले असता, ते वर्षभर तृप्त रहातात; परंतु सध्या याविषयी हिंदूंकडून सामाजिक माध्यमांद्वारे प्रबोधनपर जागृती करणाऱ्या संदेशांऐवजी यावर विनोद करणाऱ्या संदेशांचे प्रमाण अधिक असल्याचे लक्षात आले. या संदेशांपैकी काही उदाहरणे पाहूया.
एका संदेशात, कावळे एकत्र जमलेले दाखवून ‘आपला ‘एरिया’ वाटून घेण्यासाठी आपत्कालीन ‘मिटिंग’ असे लिहिले आहे. दुसऱ्या संदेशात ‘आज कितीही पक्ष बदलत रहाल; पण मेल्यानंतर एकाच पक्षात याल – ‘पितृपक्ष’ आणि तेथील चिन्ह एकच ‘कावळा’ !’ या आणि अशा प्रकारचे संदेश हिंदूच सर्वांना पाठवत असतात आणि त्यावर हसतही असतात. खरेतर हा विषय हसण्याचा आणि विनोद करण्याचा नाही, हेच हिंदूंना कळत नाही. हिंदूंना धर्मशिक्षण न दिल्यानेच ते अशा प्रकारचे विनोद करतात आणि हसतात, हे अतिशय गंभीर आणि दुर्दैवी आहे. हिंदु धर्म महान आहे. धर्मातील प्रत्येक कृतीमागे शास्त्र आहे. धर्मामध्ये सांगितलेली कोणतीच गोष्ट उगीचच सांगितलेली नाही. प्राचीन हिंदु धर्मातील कोणत्याच गोष्टींमध्ये आजपर्यंत कुणीही पालट केलेला नाही. वर्षानुवर्षे त्यातील कृती तशाच केल्या जातात, हीच हिंदु धर्माची परिपूर्णता आहे. हिंदु धर्माचे हे महत्त्व लक्षात घेऊन धर्माचे विडंबन होणारे संदेश सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित झाल्यास त्या संदेशांचा निषेध नोंदवणे आवश्यक आहे.
अशा प्रकारच्या संदेशांमुळे हिंदूंमध्ये धार्मिक विधींचे गांभीर्य अल्प होऊन ते विधी करण्यापासून परावृत्त होऊ शकतात. अर्थातच त्याचे पातक आपल्याला लागते, हे लक्षात घ्या !
पितृपक्षातील ‘श्राद्ध’ हा धर्मशास्त्रीय आधार असलेला श्रद्धेचा विषय आहे. असंख्य हिंदूंना पितृपक्षात केलेल्या श्राद्धामुळे जीवनातील समस्या सुटल्याचे अनुभव आले आहेत. त्यामुळे हिंदु धर्मातील या विधींविषयी आपण सतर्क होऊन इतरांनाही करूया. यासाठी धर्मशिक्षण घेऊन या विधींची अनुभूती घेऊया. जर कुणी विनोद करत असेल, तर त्याचेही प्रबोधन करून धर्मरक्षण करूया.
– श्री. श्रीकृष्ण नारकर, पाचल, ता. राजापूर, जिल्हा रत्नागिरी.