नागपूर येथे ‘सनातन प्रभात’च्या वाचक मेळाव्यांना चांगला प्रतिसाद !

 

नागपूर, २० सप्टेंबर (वार्ता.) – हिंदु राष्ट्र स्थापनेची संकल्पना समाजमनात बिंबवणे, हिंदूंवरील अन्यायाला वाचा फोडणे आणि त्यावर उपाययोजना सांगून हिंदूंचे संघटन करणे यांसाठी ‘सनातन प्रभात’ गेल्या २ दशकांहून अधिक काळ अविरतपणे कार्य करत आहे. ‘सनातन प्रभात’च्या वाचकांचे २ मेळावे नुकतेच स्थानिक लक्ष्मीनगर आणि महाल या भागांमध्ये आयोजित करण्यात आले होते. या मेळाव्यांना वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

वाचकांचे मनोगत

१. श्री. चिंतामण जोशी – राष्ट्राची निर्मिती साधनेनेच होऊ शकते. त्यासाठी जागृती निर्माण करणे आवश्यक असते. ती जागृती ‘सनातन प्रभात’ करत आहे.

२. श्री. मैराल – सनातन प्रभातमुळे मनुष्य आध्यात्मिकदृष्ट्या घडतो. त्याच्या बुद्धीला व्यापक दिशा मिळून राष्ट्र्रहिताच्या दृष्टीने विचारप्रक्रिया चालू होते.

३. श्री. पितळे – जीवनातील कठीण प्रसंगाना तोंड देण्याचे सामर्थ्य ‘सनातन प्रभात’मधील साधनेच्या दृष्टीकोनातून मिळाले.

४. सौ. निकम – ‘सनातन प्रभात’मुळे धर्मग्रंथांत सांगितलेल्या अनेक गोष्टी समजतात. विशेषतः अनेक प्रसंगांच्या तिथी मला माहिती नव्हत्या. त्याही ‘सनातन प्रभात’मुळे कळल्या. जसा संग तशी वृत्ती आणि कृती घडते. सनातन प्रभातमुळे सत्संग लाभतो. त्यामुळे साहजिकच वृत्ती सात्त्विक होऊन समाज सकारात्मक विचारांनी प्रेरित होऊन परिवर्तन घडेल. हिंदु राष्ट्राची निर्मिती होणे अत्यावश्यक आहे; परंतु मिळालेले राष्ट्र टिकवणे आणि त्यासाठी सामर्थ्य निर्माण करणे हे कार्य ‘सनातन प्रभात’ करत आहे. ‘सनातन प्रभात’मुळे सण, उत्सव आणि कुलदेवता यांचे महत्त्व समजले. देश-विदेशातील उलाढालींवर योग्य दृष्टीकोन मिळतो.

५. कविता बाकरे – आमच्याकडे १५ वर्र्षांपासून ‘सनातन प्रभात’ येतो. अंक वाचल्याने मन शांत रहाते. राष्ट्र्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे विषय वाचून ‘आपणही धर्मासाठी काही करावे’, असे वाटते.

६. टालाटुले (शिक्षिका) – ‘सनातन प्रभात’मध्ये सांगितल्यानुसार मी माझ्या शाळेत सण-उत्सव शास्त्रानुसार साजरे करण्याचा प्रयत्न करते.