शाळांमधील श्री सरस्वतीदेवीची चित्रे काढली जाणार नाहीत ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कुणाला काय वाटते, ते करणार नाही. शाळांमधील श्री सरस्वतीदेवीची चित्रे काढली जाणार नाहीत, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींसमोर मांडली.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांवर त्यांच्या सहभागानुसार कारवाई होईल ! – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाप्रमाणे एकतरी कृत्य केले आहे का ? त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याविषयी बोलणे मूर्खपणाचे आहे.

निवृत्त लेफ्टिनंट जनरल अनिल चौहान नवीन सी.डी.एस्. !

उत्तराखंडचे असलेले चौहान ‘गोरखा रायफल’मध्ये अधिकारी होते. चौहान हे सी.डी.एस्. समवेतच सैन्याच्या विविध विभागांचे सचिव म्हणूनही काम करणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट !

श्री सरस्वतीदेवीचे पूजन आणि प्रतिमा शाळेत ठेवण्याच्या विरोधात वक्तव्य केल्याने हिंदु धर्माचा अवमान झाला असून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.

‘पी.एफ.आय.’च्या वेबसाइट आणि सोशल मीडिया खाती यांवर बंदीचे आदेश

या संघटनांचा अवैध अपप्रचार रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

(म्हणे) ‘भाग्यनगर येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड करणार्‍या मुसलमान महिला मनोरुग्ण !’ – पोलिसांचा दावा

मुसलमान जेव्हा हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे करतात, तेव्हा बर्‍याच वेळेला पोलीस त्यांना ‘मनोरुग्ण’ ठरवून हिंदूंची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. आताही तोच प्रकार करण्यात आला आहे, असेच म्हणावे लागले !

संभल (उत्तरप्रदेश) येथे देवतांची चित्रे फाडणे आणि जाळणे यांप्रकरणी २ ख्रिस्ती नन्सना अटक

हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न !

गुरुग्राम (उत्तरप्रदेश) येथे गावकर्‍यांनी बंदुकीचा धाक दाखवून रस्ता दुरुस्त करून घेतला !

३० गावकर्‍यांच्या विरोधात गुन्हा नोंद

‘पीएफआय’वर बंदी हा अंतर्गत आतंकवादावर ‘सर्जिकल स्ट्राइक’ ! – श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

सनातन संस्थेने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, ‘पी.एफ्.आय.’वरील बंदी, ही ‘गझवा-ए-हिंद’ अर्थात् भारताला ‘इस्लामिक स्टेट’ बनवण्याची स्वप्ने बाळगणार्‍या जिहादी प्रवृत्तींना चपराक आहे.

अखेर शी जिनपिंग १० दिवसांनी सरकारी दूरचित्रवाहिनीवर दिसले !

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना पदच्यूत करून नजरकैदेत ठेवण्यात आले आहे, अशा प्रकारचे वृत्त सामाजिक माध्यमांतून गेल्या काही दिवसांत प्रसारित झाले होते.