‘पी.एफ.आय.’च्या वेबसाइट आणि सोशल मीडिया खाती यांवर बंदीचे आदेश

नवी देहली – केंद्र सरकारने ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) आणि तिच्या ८ संलग्न संघटना यांचे संकेतस्थळ आणि सामाजिक संकेतस्थळे यांवर बंदी घालण्याचा आदेश दिला आहे.  फेसबुक आणि ट्विटर यांना ‘पी.एफ्.आय.’शी संबंधित सर्व खाती त्वरित बंद करण्यास सांगितले आहे. या संघटनांचा अवैध अपप्रचार रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. सरकारने याविषयी अजून अधिकृत घोषणा केलेली नाही.

बंदी घालण्यत आलेल्या संघटनांना कुठलेही प्रसिद्धीपत्रक प्रसारित करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले आहे. ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.), ‘रिहॅब इंडिया फाऊंडेशन’ (आर्.आय.एफ्.) आणि ‘ऑल इंडिया इमाम कौन्सिल (एआयआयसी) यांची संकेतस्थळे बंद करण्यात आली आहेत. त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप खात्यांवरही लक्ष ठेवले जाईल आणि त्यांच्या देशविरोधी कृतीवर कारवाई केली जाईल, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.