शाळांमधील श्री सरस्वतीदेवीची चित्रे काढली जाणार नाहीत ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई – कुणाला काय वाटते, ते करणार नाही. शाळांमधील श्री सरस्वतीदेवीची चित्रे काढली जाणार नाहीत, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींसमोर मांडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी ‘ज्यांनी शिक्षण दिले त्यांची चित्रे शाळेत लावा, जिला आम्ही पाहिले नाही, जिने आम्हाला शिकवले नाही, त्यांची पूजा कशाला करायची ?’ असे हिंदुद्वेषी वक्तव्य अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या एका कार्यक्रमात केले. (कॉन्व्हेंट शाळांवर क्रॉस कशाला ? किंवा मदरशांत धार्मिक शिक्षण कशाला ?, असे म्हणण्याचे भुजबळ यांचे धैर्य आहे का ? – संपादक) याविषयी पत्रकारांनी विचारले असता एकनाथ शिंदे यांनी वरील भूमिका स्पष्ट केली.