अखेर शी जिनपिंग १० दिवसांनी सरकारी दूरचित्रवाहिनीवर दिसले !

बीजिंग (चीन) – चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना पदच्यूत करून नजरकैदेत ठेवण्यात आले आहे, अशा प्रकारचे वृत्त सामाजिक माध्यमांतून गेल्या काही दिवसांत प्रसारित झाले होते. या काळात शी जिनपिंग कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसून आले नव्हते; मात्र आता जवळपास १० दिवसांनंतर शी जिनपिंग सरकारी दूरचित्रवाहिनीवर दिसून आले. अझरबैजान येथील समरकंदमध्ये ‘शांघाय कोऑपरेशन समिट’मधून परतल्यावर त्यांना अलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यामुळे वरील प्रकारची वृत्ते पसरली होती.