राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट !

मुंबई – शाळांमधून श्री सरस्वतीदेवीची प्रतिमा हटवण्याचे वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या विरोधात ‘महाराष्ट्र करणी सेने’चे प्रमुख अजयसिंग सेंगर यांनी कफ परेड पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.


श्री सरस्वतीदेवीचे पूजन आणि प्रतिमा शाळेत ठेवण्याच्या विरोधात वक्तव्य केल्याने हिंदु धर्माचा अवमान झाला असून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. भुजबळ यांनी समाजात अशांतता पसरवण्याचे काम केले आहे, असे सेंगर यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे. सेंगर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हिंदुत्वनिष्ठ संघटनांसमवेत या संदर्भात निवेदनही दिले आहे.