संभल (उत्तरप्रदेश) येथे देवतांची चित्रे फाडणे आणि जाळणे यांप्रकरणी २ ख्रिस्ती नन्सना अटक

हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न !

संभल (उत्तरप्रदेश) – येथे हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या २ नन्सना अटक करण्यात आली. त्यांच्यावर देवतांची चित्रे फाडण्याचा आणि जाळण्याचाही आरोप आहे. या दोघांचाही ख्रिस्ती मिशनर्‍यांशी संबंध आहे. त्या मिशनर्‍यांकडून संचालित स्थानिक शाळा सी.डी.एम्. मध्ये कार्यरत आहेत. ही घटना सिरसानाल गावात २१ सप्टेंबरला घडली होती. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस उपायुक्त आणि उपजिल्हाधिकारी घटनास्थळी पोचले होते.

संपादकीय भूमिका

देशात लवकरात लवकर धर्मांतरविरोधी कायदा करणे आवश्यक आहे, हेच अशा घटनांतून लक्षात येते !