निवृत्त लेफ्टिनंट जनरल अनिल चौहान नवीन सी.डी.एस्. !

(चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सी.डी.एस्.), म्हणजे तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख)

निवृत्त लेफ्टिनंट जनरल अनिल चौहान

नवी देहली – केंद्रशासनाने निवृत्त लेफ्टिनंट जनरल अनिल चौहान यांची नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सी.डी.एस्.) या पदावर नियुक्ती केले आहे. ते सध्या उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम करत आहेत. मूळचे उत्तराखंडचे असलेले चौहान ‘गोरखा रायफल’मध्ये अधिकारी होते. चौहान हे सी.डी.एस्. समवेतच सैन्याच्या विविध विभागांचे सचिव म्हणूनही काम करणार आहेत. याच वर्षी पहिले सी.डी.एस्. बिपीन रावत यांच्या अपघाती निधनानंतर हे पद रिक्त होते.