महाराष्ट्रातील हिंदुविरोधी राजकारण आपल्याला संपवायचे आहे ! – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

महाराष्ट्रातील हिंदुविरोधी राजकारण आपल्याला संपवायचे आहे, असे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपच्या आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट केली. ५ सप्टेंबर या दिवशी मुंबईत आल्यावर भाजप पदाधिकार्‍यांच्या बैठकीत ते बोलत होते.

श्री गणेशाच्या विडंबनात्मक मूर्ती ट्विटरवर ठेवून ‘यामुळे भावना दुखावत नाहीत का ?’ असा अभिनेते प्रकाश राज यांचा प्रश्न

श्री गणेशमूर्ती मूर्तीशास्त्रानुसार योग्य रूपात सिद्ध केली, तर त्यातून चैतन्य प्रक्षेपित होऊन भाविकांना लाभ होतो. मूळ स्वरूपापेक्षा भिन्न स्वरूपातील मूर्ती सिद्ध करून त्याचा भाविकांना अपेक्षित लाभ होत नाही.

वांद्रे (मुंबई) आणि बंगाल येथून संशयित जिहादी कह्यात

बंगाल स्पेशल टास्क फोर्स एस्.टी.एफ्. पोलिसांनी मुंबई आतंकवादविरोधी पथकाच्या साहाय्याने केलेल्या कारवाईत ३ ऑक्टोबर या दिवशी सकाळी सद्दाम हुसेन खान (वय ३४ वर्षे) याला मुंबईतील निर्मलनगर, वांद्रे परिसरातून आणि समीर हुसेन शेख (वय ३० वर्षे) याला बंगालमधून अटक केली.

गुजरातमध्ये ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात भव्य मोर्चा

गुजरातमधील बनासकांठा येथे अलीकडेच ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला. राज्यातील सत्ताधारी भाजपचे आमदार शशिकांत पंड्या यांनी हा मोर्चा आयोजित केला होता. इतर अनेक हिंदु संघटनांनीही त्यांना पाठिंबा दिला. या मोर्च्यामध्ये १० सहस्रांहून अधिक लोक सहभागी झाले होते.

लिज ट्रस ब्रिटनच्या नवनिर्वाचित पंतप्रधान

ब्रिटनच्या पंतप्रधान म्हणून लिज ट्रस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. ४७ वर्षांच्या ट्रस ब्रिटनच्या नवीन पंतप्रधान असणार आहेत.

विवाहित मुसलमान तरुणाने हिंदु असल्याचे भासवून हिंदु अल्पवयीन मुलीशी जवळीक साधून केला बलात्कार !

रब्बानी अन्सारी नावाच्या विवाहित मुसलमानाने हिंदु असल्याचे खोटे नाव धारण करून हिंदु अल्पवयीन मुलीशी मैत्री केली. नंतर तिच्याशी लग्न करणार असल्याचे सांगून तिचे लैंगिक शोषण चालू केले. तिच्यावर बलात्कार केला.

पुणे शहरातील गर्दीमध्ये भ्रमणभाष चोरणारे जेरबंद !

शहरामध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची गर्दी होत आहे. या गर्दीचा अपलाभ घेत भ्रमणभाष चोरीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. समाजाला धर्मशिक्षण देऊन नीतीवान बनवणे किती आवश्यक आहे, हे दर्शवणारी घटना !

भोर (पुणे) येथे पारंपरिक पद्धतीने श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन !

भोर शहरातील शनिघाट (राजवाडा), निरामाई घाट, रामबाग येथील ओढा, भाटघर धरण येथे घरगुती आणि सार्वजनिक गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन होत आहे.

कोल्हापुरात स्वयंचलित यंत्राद्वारे घरगुती श्री गणेशमूर्तींचे काळ्या खणीत विसर्जन !

श्री गणेशोत्सव हा धार्मिक उत्सव असून प्रशासनाने भाविकांना यांत्रिक पद्धतीने नाही, तर विधीवत् पद्धतीने वहात्या पाण्यातच मूर्तीविसर्जन करू देणे अपेक्षित आहे ! असे न करता महापालिका प्रशासन एकप्रकारे हिंदूंच्या धार्मिक भावनांची गळचेपीच करत आहे !

आमदार टी. राजासिंह यांना सशस्त्र सुरक्षा पुरवण्यात यावी !

हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे जिल्हा प्रशासनाकडे निवेदन