भोर (जिल्हा पुणे) – काही वर्षांपूर्वी येथून गणेशमूर्तीदानाच्या उपक्रमाला आरंभ करून संपूर्ण महाराष्ट्रात ‘भोर पॅटर्न’ राबवण्यात आला होता; परंतु भोर येथील गणेशभक्त आणि धर्माभिमानी यांनी त्याला तीव्र विरोध केल्याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीला हा धर्मद्रोही उपक्रम कायमस्वरूपी गुंडाळावा लागला. प्रतीवर्षीप्रमाणे या वर्षीही भाविक गणेशमूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन करून धर्मपालनाचा आनंद घेत आहेत.
भोर शहरातील शनिघाट (राजवाडा), निरामाई घाट, रामबाग येथील ओढा, भाटघर धरण येथे घरगुती आणि सार्वजनिक गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन होत आहे. भोर नगरपालिकेने विसर्जन घाटाची स्वच्छता केली आहे. ‘भोईराज जल आपत्ती संघा’चे स्वयंसेवक कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून आणि गणेशभक्तांना विसर्जनासाठी साहाय्य करत आहेत.