
पुणे – शहरामध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची गर्दी होत आहे. या गर्दीचा अपलाभ घेत भ्रमणभाष चोरीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. सिंहगड रस्ता पोलिसांनी कर्नाटकातील शरथ मंजुनाथ, केशवा लिंगराजू, नवीन हनुमानथाप्पा या तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून १५ लाख २५ सहस्र रुपयांचे एकूण ८४ भ्रमणभाष शासनाधिन करण्यात आले आहेत. पोलीस अधिकारी ठाण्याच्या हद्दीमध्ये गस्त घालत असतांना सिंहगड रस्त्यावरील ‘फनटाईम थिएटर’च्या परिसरामध्ये हे तीघे संशयितरित्या थांबले होते. त्यांच्याकडे अधिक चौकशी करता त्यांच्याकडील पिशवीची पडताळणी केली असता भ्रमणभाष सापडले. या टोळीने मार्केट यार्ड, भाजी मंडई, स्वारगेट परिसर, कात्रज भाजी मंडई, अभिरुची परिसर येथे या चोर्या केल्याचे अन्वेषणामध्ये निष्पन्न झाले.
संपादकीय भूमिकासमाजाला धर्मशिक्षण देऊन नीतीवान बनवणे किती आवश्यक आहे, हे दर्शवणारी घटना ! |
मुंबईत उंदरांनी कुरतडलेली फळे ग्राहकांना दिली जात असल्याचा आरोप !
संसदेचे कामकाज गदारोळामुळे दिवसभरासाठी स्थगित
बिबवेवाडीतील (पुणे) रस्त्यावरील शोभिवंत १०० दिवे चोरीला !
महापालिकेतील उपायुक्तांचा पुतण्या असल्याचे सांगून फसवणूक करणारा कह्यात !
श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठावरील बटूंच्या यशाची मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून नोंद
मुंबई उच्च न्यायालयाकडून वर्ष २०१३ मधील ३५ सहस्र कोटी रुपयांच्या खाण घोटाळ्यासंबंधीचा गुन्हा रहित