कोल्हापूर, ५ सप्टेंबर (वार्ता.) – कोल्हापूर महापालिका प्रशासन भाविकांना पंचगंगा नदीमध्ये श्री गणेशमूर्ती विसर्जनास बंदी करून काळी खण, तसेच ठिकठिकाणी विसर्जन कुंडात मूर्तीविसर्जन करण्यास भाग पाडत आहे. शहरातील काळी खण येथे तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पुढाकाराने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ८० लाख रुपये संमत करण्यात आले असून त्या माध्यमातून एका स्वयंचलीत यंत्राद्वारे घरगुती श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येत आहे. या स्वयंचलीत यंत्रामध्ये एक फिरणारा पट्टा असून त्यावर एका बाजूने श्रीगणेशमूर्ती ठेवण्यात येत असून त्या पटट्यावरून सरकत जाऊन पुढे खणीत विसर्जित होतात. अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
पंचगंगा नदीवर प्रशासनाने बॅरॅकेट्स लावून भाविकांनी बंदी केली असून अप्रत्यक्षरित्या त्यांच्यासमोर पर्यायच नसल्याने भाविकांना नाईलाजास्तव कृत्रिम कुंडात विसर्जन करावे लागत आहे.
संपादकीय भूमिका
|