‘गेट वे ऑफ इंडिया’ जवळील समुद्रात विसर्जनाला ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’ची अनुमती !

गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, माहीम, जुहू समुद्रकिनार्‍यांसह आरे कॉलनी आणि इतर ठिकाणच्या तलावांवर विसर्जनाची सिद्धता केली आहे. विसर्जनाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

वाकड (पुणे) येथे पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली नागरिकांना कृत्रिम विसर्जन हौदात मूर्ती विसर्जन करण्याचे आवाहन

हिंदूंना धर्माचरणापासून परावृत्त करणार्‍यांपासून सावध राहून हिंदूंनी धर्मशास्त्रानुसारच मूर्तीविसर्जन करावे !

विदर्भाची कुलस्वामिनी श्री अंबामातेच्या साक्षीने ‘हिंदु राष्ट्र स्थापने’ची शपथ !

हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीच्या निमित्ताने अमरावतीमध्ये ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियाना’ला प्रारंभ.

हडपसर (पुणे) क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ३६ ठिकाणी मूर्ती संकलनाची व्यवस्था, तसेच १५ फिरते विसर्जन हौद !

मूर्तीविसर्जनाचे धर्मशास्त्र पाळण्यास प्रशासनाकडून होणारा प्रतिबंध, हा हिंदूंवरील अन्यायच आहे ! अन्य धर्मियांच्या बाबतीत अशी शास्त्रविरोधी भूमिका घेण्याचे धाडस प्रशासन दाखवेल का ?

खासदार संजय राऊत यांच्या कोठडीत १४ दिवसांची वाढ

पत्राचाळ भूमी गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे १९ सप्टेंबरपर्यंत त्यांना आर्थर रोड कारागृहात रहावे लागणार आहे.

अवाजवी तिकीट दर आकारणार्‍या खासगी कंत्राटी वाहतूकदारांवर कारवाई करा ! – उपप्रादेशिक परिवहन विभाग, रत्नागिरी

ज्याप्रमाणे रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई केली, तशी कारवाई राज्यातील अन्यत्रच्या विभागांनीही करावी !

सोलापूर येथील श्री हिंगुलांबिका मंदिरात भक्तांनी घेतली ‘हिंदु राष्ट्र स्थापने’ची शपथ !

सोलापूर येथील ‘श्री ब्रह्मानंद गणपति समाजसेवा मंडळ ट्रस्ट’च्या वतीने मंडळामध्ये हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ घेण्यात आली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे यांच्या हस्ते श्री गणेशाचे पूजन आणि आरती करण्यात आली.

नागपूर येथे नरेंद्र मोदी यांचा देखावा साकारलेल्या गणेशोत्सव मंडळाची श्री गणेशमूर्ती पोलिसांच्या कह्यात !

चंद्रशेखर आझाद बहुउद्देशीय संस्थेची गणेशमूर्ती शहरातील वादग्रस्त श्री गणेशमूर्ती म्हणूनही ओळखली जाते. या संस्थेच्या माध्यमातून देशात चालू असलेल्या वादविवादला गणेशोत्सवात माध्यमातून लोकांना दाखवले जाते.

सांगली महापालिका प्रशासनाच्या मूर्तीदान मोहिमेस नगण्य प्रतिसाद !

सहस्रो भाविकांचे कृष्णा नदीत शास्त्रानुसार श्री गणेशमूर्ती विसर्जन !