विवाहित मुसलमान तरुणाने हिंदु असल्याचे भासवून हिंदु अल्पवयीन मुलीशी जवळीक साधून केला बलात्कार !

झारखंडमध्ये ‘लव्ह जिहाद’चे आणखी एक प्रकरण उजेडात !

रांची – झारखंडच्या लोहरदगामध्ये ‘लव्ह जिहाद’चे नवीन प्रकरण समोर आले आहे. येथील रब्बानी अन्सारी नावाच्या विवाहित मुसलमानाने हिंदु असल्याचे खोटे नाव धारण करून हिंदु अल्पवयीन मुलीशी मैत्री केली. नंतर तिच्याशी लग्न करणार असल्याचे सांगून तिचे लैंगिक शोषण चालू केले. तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीला सत्य समजल्यावर त्याने तिला मारहाण करणे चालू केले. एवढेच नाही तर तिच्यावर दबाव आणण्यासाठी त्याने तिचा अश्लील व्हिडिओ प्रसारित केला, तसेच तिला विहिरीत ढकलून ठार मारण्याचा प्रयत्न केला; मात्र तरुणी कशीबशी बचावली. तिने कुटुंबियांना घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी आवाज उठवला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे, असे पोलिसांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वीच झारखंडमधील दुमका येथे शाहरुख हुसेन नावाच्या मुसलमान तरुणाने अल्पवयीन हिंदु मुलीवर मैत्रीसाठी दबाव टाकला होता. मुलीने प्रतिसाद न दिल्याने तिच्यावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्यात आले. अखेर त्या मुलीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्यभरात ‘लव्ह जिहाद’च्या घटनांवरून हिंदु संघटनांमध्ये संताप व्यक्त होत आहे.