घाबरणे सोडा; आपण दुर्बलतेचे उपासक नाही ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

नागपूर – भारताला मोठे करायचे आहे. यासाठी आपण घाबरणे थांबवले पाहिजे. घाबरणे सोडले, तर भारत एकसंध होईल. आपण अहिंसेचे उपासक निश्चितच आहोत; पण दुर्बलतेचे नाही. भाषा, वेशभूषा अणि संस्कृती यांमध्ये आपल्यात काही भेद आहेत; पण या गोष्टींमध्ये आपण अडकू नये, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. १४ ऑगस्ट या दिवशी येथे झालेल्या ‘उत्तिष्ठ भारत’ कार्यक्रमात ते बोलत होते.

डॉ. मोहन भागवत पुढे म्हणाले,

१. भारताच्या अस्तित्वात एकता आहे. जग विविधतेचे व्यवस्थापन करण्यासाठी भारताकडे पहाते.

२. ऐतिहासिक घटना आपल्याला सांगितल्या किंवा नीट शिकवल्या नाहीत. जेथे संस्कृत व्याकरणाचा जन्म झाला, ते ठिकाण भारतात नाही; पण आपण प्रश्न विचारला का ? आपण आपले ज्ञान आधीच विसरलो. नंतर परकीय आक्रमकांनी आपल्या भूमीवर नियंत्रण मिळवले. विनाकारण आपल्यात भेद निर्माण करण्यासाठी जातीपातीची दरी निर्माण करण्यात आली.

(सौजन्य : RITAM BANGLA) 

३. ‘देशातील सर्व भाषा या राष्ट्रभाषा आहेत आणि सर्व जातीधर्माचे लोक माझे आहेत’, अशी आपल्यात आपुलकी हवी.