गुंतवणूक क्षेत्रातील तज्ञ राकेश झुनझुनवाला यांचे निधन

मुंबई – गुंतवणूक क्षेत्रातील तज्ञ आणि ‘शेअर बाजाराचे राजा’ म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला (वय ६२ वर्षे) यांचे १४ ऑगस्टला निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्‍वास घेतला. सकाळी ६.४५ वाजता त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तपासणीनंतर आधुनिक वैद्यांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांनी नुकतीच ‘अकासा’ ही विमान वाहतूक सेवा चालू केली होती.

वर्ष १९८५ मध्ये भारतीय शेअर बाजारात त्यांनी केवळ ५ सहस्रांची गुंतवणूक करत कारकीर्द चालू केली होती. ‘सर्वसामान्यांना शेअर बाजारात गुंतवणूक करून श्रीमंत होता येते’, हे स्वप्न त्यांनी भारतीय गुंतवणूकदारांना दाखवले. ‘फोर्ब्स’ आस्थापनाच्या सूचीनुसार त्यांची संपत्ती ५.५ बिलियन डॉलर्स इतकी आहे.