राजस्थान येथे पाकसाठी हेरगिरी करणार्‍या दोघा हिंदूंना अटक

जयपूर (राजस्थान) – भारतीय सैन्याची गोपनीय माहिती पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या अधिकार्‍यांना पुरवणार्‍या दोघा जणांना राजस्थान पोलिसांनी अटक केली.

कुलदीप सिंह शेखावत (वय २४ वर्षे) आणि नारायण लाल गडारी (वय २७ वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. हे दोघे भारतीय सैनिकांशी जवळीक साधून त्यांच्याकडून गोपनीय माहिती काढून घेत होते. ही माहिती पुरवल्यावर त्यांना ऑनलाईन पैसे पाठवले जात होते. हे दोघे भीलवाडा आणि पाली येथील स्थानिक हेर होते.

संपादकीय भूमिका

अशांवर जलद गती न्यायालयाला खटला चालवून त्यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !