सलमान रश्दी यांच्यानंतर आता ‘हॅरी पॉटर’ पुस्तकाच्या लेखिका जे.के. रोलिंग यांना ठार मारण्याची धमकी

लेखिका जे.के. रोलिंग

लंडन (ब्रिटन) – ‘हॅरी पॉटर’ या जगप्रसिद्ध पुस्तकाच्या लेखिका आणि ब्रिटनच्या नागरिक जे.के. रोलिंग यांना आता ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यापूर्वी भारतीय वंशाचे ब्रिटीश-अमेरिकी लेखक सलमान रश्दी यांना अशी धमकी देण्यात आली होती आणि ३ दिवसांपूर्वीच त्यांच्यावर न्यूयॉर्क येथे प्राणघातक आक्रमण करण्यात आले होते. जे.के. रोलिंग यांनी रश्दी यांच्यावर करण्यात आलेल्या आक्रमणाच्या निषेधार्थ ट्वीट केले होते.

या ट्वीटवर एकाने उत्तर देतांना म्हटले, ‘घाबरू नका. यानंतर तुमचा क्रमांक आहे.’ ज्या ट्विटर खात्यावरून रोलिंग यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे, त्याच खात्यावरून रश्दी यांच्यावर आक्रमण करणारा हादी मातर याचे कौतुक करण्यात आले आहे.