कानपूर येथून जैश-ए-महंमदच्या आतंकवाद्याला अटक  

कानपूर (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशच्या आतंकवादविरोधी पथकाने जैश-ए-महंमद या जिहादी आतंकवादी संघटनेचा आतंकवादी हबीबूल इस्लाम याला येथून अटक केली. काही दिवसांपूर्वीच नदीम नावाच्या आतंकवाद्याला अटक करण्यात आली होती. त्याने नूपुर शर्मा यांच्या हत्येचा कट रचला होता. त्याच्या चौकशीतून त्याने हबीबूल याची माहिती दिल्यावर त्याला अटक करण्यात आली. हबीबूल हा विविध सामाजिक माध्यमांद्वारे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान येथील जिहादी आतंकवाद्यांच्या संपर्कात होता.

संपादकीय भूमिका 

जिहादी आतंकवाद्यांनी पोखरलेला भारत ! अशांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे !